Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

नारायण टेंभी हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.रामयांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. नारायण टेंभी गावात दक्षिण मुखी हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे नारायण टेंभी गावाची, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्यासुमारे १३७५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १, सभामंडप-२ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०१९ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत नारायण टेंभी ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १०० % कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, तसेच गावात प्राचीन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणी साठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून द्राक्ष,ऊस,कांदा,टमाटे,सोयाबीन व मका ही  प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, तसेच दुग्ध व्यवसाय करतात

नारायण टेंभी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावी पणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुलचा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोनगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODFप्लस) दर्जा मिळवला आहे. पेय जल या पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छता ठेवली जाते.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ५ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

नारायण टेंभी गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

नारायण टेंभी हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे कि.मी. अंतरावर वसलेलेआहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ४२८.५४.७७ हे. असून  ग्रामपंचायती मध्ये  वार्ड आहेत. एकूण  २८० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, जनगणना २०११ नुसार लोकसंख्या १३७५ आहे. त्यामध्ये ६७५ पुरुष व ६९९ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेती योग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत मीटर अंतरावर काजळी नदी, पाराशरी नदी व कादवा नदी असून नदीमुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्ण कटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १०°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६५ ते ७५ से.मी. पर्जन्य वृष्टी होते.

नारायण टेंभी गाव द्राक्ष कांदा, टोमाटो उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जल संधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

नारायण टेंभी गावाचे लोकजीवनसाधे, श्रम प्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेती सहकाही लोक दुग्ध व्यवसाय, यामध्ये ही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक परंपरा जो पासल्या जातात. वर्ष भरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवोभव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास स्वयंसाहाय्यगटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेनेवाट चाल करीत आहे.

नारायण टेंभीच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृती सोबतच आधुनिकते चीझल कही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
पुरुष ६७५
स्त्रिया ६९९
एकूण १३७५

संस्कृती व परंपरा

नारायण टेंभी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, श्रावण सप्ताह, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात राम, मारुती, विठ्ठल व शंकराचे मंदिर असून गावात श्री.नारायण देव बाबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात २ दिवस भरवली जाते त्यात प्रामुख्याने कावड रथ मिरवणूक हे आकर्षण आहे ,गावातील प्रमुख देवतांच्या पूजा अर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपराज पतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्यगटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे नारायण टेंभी गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकतायांचा सुंदर संगमसाधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत नारायण देव बाबा मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दर वर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शेती क्षेत्र द्राक्षबागा – नारायण टेंभी द्राक्ष कांदा टोमाटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्ष बागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

नारायण टेंभी गाव निफाड तालुक्यात असून नारायण टेंभी गावाच्या लगतच पिंपळगाव बसवंत सारखी मोठी बाजारपेठ आहे.तसेच नारायण टेंभी गावाच्या आजूबाजूला  जी गावे आहेत ती सर्व  नारायण टेंभी गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेली आहेत.

पिंपळगांव बसवंत, लोणवाडी, बेहेड, वडाळी नजिक, शिरसगाव, कारसूळ हि गावे नारायण टेंभी गावच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ.क्र. नाव पद मोबाईल क्रमांक
श्री. प्रशांत दिलीप बोरसे प्रशासक ९७६६६६४२६५
श्री. विलास राजाराम पवार ग्रामपंचायत अधिकारी ९४२१९०२७३७

लोकसंख्या आकडेवारी


२८०
१३७५
६७५
६९९
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11
Logo 12